एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही 'तानाजी' 'छपाक'च्या वरचढ
प्रदर्शनापूर्वीच दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत छपाक 'तानाजी' पेक्षा खूप मागे राहिला.
मुंबई : गेल्या शुक्रवारी दीपिका पादुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' मोठ्या पडद्यावर एकत्र आला. प्रदर्शनापूर्वीच दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. पण बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत छपाक 'तानाजी' पेक्षा खूप मागे राहिला. पण दीपिकाचा छपाक कमाईच्या बाबतीत नाही तर गुगल ट्रेंडमध्येही मागे राहिला आहे.
मंगळवारी अजय देवगण, सैफ अली खान आणि काजल स्टारर फिल्म तानाजी या चित्रपटाने 15.28 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी, रविवारी 26.26 कोटी आणि सोमवारी 13.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटाने पाच दिवसांत 90.96 कोटींचा व्यवसाय केला आहे.#Tanhaji is unshakable... Solid trending on weekdays... Day 5 is higher than Day 1 and 4... Eclipses biz of *all* #Hindi films... Will cross ₹ ???? cr today [Wed; 15 Jan]... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.26 cr, Mon 13.75 cr, Tue 15.28 cr. Total: ₹ 90.96 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2020
दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेसी यांची स्टार कास्ट असणारा मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरला नाही. पाचव्या दिवशी चित्रपटाने 2 कोटींची कमाई केली. छपाकने शुक्रवारी 4.77 कोटी, शनिवारी 6.90 कोटी, रविवारी 7.35 कोटी आणि सोमवारी 2.35 कोटी कमाई केली. चित्रपटाने पाच दिवसांत एकूण 23.37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.#Chhapaak gets the benefit of partial holiday [Day 5]... Will, again, stay steady today [Wed; 15 Jan] due to #MakarSankranti festivities [partial holiday]... Fri 4.77 cr, Sat 6.90 cr, Sun 7.35 cr, Mon 2.35 cr, Tue 2.55 cr. Total: ₹ 23.92 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
Advertisement