(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayodhya Cantt : फैजाबाद छावणीचं नाव आता अयोध्या छावणी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी
Faizabad Cantt Name: यूपीच्या योगी सरकारने फैजाबादचे नाव या आधीच बदलून अयोध्या असं केलं आहे.
Faizabad Cantt Name Change: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. फैजाबाद छावणीचं (Faizabad Cantt) नाव बदलून त्यांनी अयोध्या छावणी (Ayodhya Cantt) असं केल्याचं जाहीर केलं. यूपीच्या योगी सरकारने या आधीच फैजाबादचे जिल्ह्याचं नाव बदलून ते अयोध्या असं केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या प्रकरणीच्या सुनावणीनंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा शिलान्यास केला होता. त्यानंतर मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू झालं. त्यानंतर या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली होती. याच पार्श्वभूमीवर आता फैजाबाद छावनीचे नाव बदलून अयोध्या छावणी असं करण्यात आलं आहे.
Correction | Defence minister Rajnath Singh approves the proposal to change the name of Faizabad Cantt to Ayodhya Cantt: Sources pic.twitter.com/OqaViTAG2e
— ANI (@ANI) October 4, 2022
सन 2018 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या असं केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ असे ठेवलं होतं. तर भगवान श्रीराम यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा त्यांनी केली. त्या आधी योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :