एक्स्प्लोर

Dawood Ibrahim: भाचा रिझवान कासकरच्या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला राग अनावर

Dawood Ibrahim: देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या जवळच्या साथीदारांकडून करण्यात येत असलेल्या टेरर फंडिंग प्रकरणाचा शोध सुरू केलाय.

Dawood Ibrahim: देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत असलेल्या टेरर फंडिंग प्रकरणाचा शोध सुरू केलाय. या प्रकरणी एनआयएनं छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख (Arif Abubakar shaikh)  उर्फ ​​आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर अबुबकर शेख (Shabbir Abubakar Shaikh)  यांना अटक केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दाऊदच्या डी कंपनीच्या बेकायदेशीर कामात हे लोक सहभागी होते. त्यांनी देशात अशांतता पसरवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. भारतामध्ये एकेकाळी आरिफ हा छोटा शकीलच्या सर्व ऑपरेशन्सचा मुख्य होता. 

आरिफला 2016 मध्ये मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं खंडणीच्या आरोपाखाली अटक केली होती. अरिफसह 9 जणांना 2006 मध्ये दुबईतून भारतात पाठवण्यात आलं होतं. त्यांच्यावर 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या यांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती, त्यानंतर शकीलच्या संपर्कात नव्हता आणि सामान्य जीवन जगत होता, अशी माहिती आहे.

दाऊद इब्राहिमला राग अनावर
एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रँचनं 2019 मध्ये  दाऊद इब्राहिमचा भाचा रिझवान कासकर याला अटक केली. दाऊद इब्राहिमला याची माहिती मिळताच त्यानं संपाप व्यक्त केला. त्यावेळी तो म्हणाला होता की, त्याच्या कुटुंबातील नवीन पिढीला नवीन पिढीला पोलीस कशी काय अटक करू शकते? असा प्रश्न त्यानं विचारला. त्यानंतर आरिफनं रिझवानची सुटका करण्यासाठी त्याच्या नेटवर्कद्वारे दाऊदकडं दोन कोटींची मागणी केली. त्यानंतर त्याला पाकिस्तानमधून टोकन म्हणून 50 लाख रुपये पाठवले गेले, असा दावा एजन्सीच्या सूत्रांकडून करण्यात आला. 

चौकशीदरम्यान समोर आलेली माहिती
सलीम फ्रुट दोन वर्षांपूर्वी मलेशियाला गेला होता. त्यानंतर भारतात पैसा गोळा करण्याचं नियोजन करण्यासाठी लपतछपत अंडरवर्ल्डच्या लोकांना भेटण्यासाठी तो पाकिस्तान पोहचला. सलीम फ्रूटला जेव्हा-जेव्हा पाकिस्तानात जायचे असते तेव्हा तो कुठल्यातरी देशात निघून जातो आणि तिथे तो गायब होऊन अवैध मार्गाने पाकिस्तानात पोहोचतो. मलेशियाला गेल्यानंतर सलीम फ्रुट राहत असल्याचं तपास यंत्रणांना कळले, तेव्हा त्याचा एकही रेकॉर्ड सापडला नाही. त्यानंतर त्यानं पाकिस्तानचा खुलासा केला. महत्वाचं म्हणजे, सलीम फ्रुटच्या पत्नीच्या नावावर दक्षिण मुंबईत दोन इमारती असून इमारती बांधण्यासाठी खंडणीच्या नावाखाली अनेक बिल्डरकडून फ्लॅट घेतल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. एजन्सींच्या रडारपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सलीम फ्रूट आपल्या पत्नीच्या नावावर अनेक गोष्टी करत असे, असाही दावा सूत्रांनी केला आहे.

सलीम फ्रुट कोण आहे?
कौटुंबिक संबंधामुळं सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. सलीमचा विवाह छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळं विकायचे.त्यामुळं सलीमला सलीम फ्रूट अशा नावानं ओळखलं जातं. या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळं निर्यात करायचा.दुबईमध्ये त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये काय लिहिलंय?
राष्ट्रीय तपास संस्थेने या वर्षाच्या सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिमनं भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केली आहे. त्यानं भारतातील मोठे नेते आणि उद्योगपतींना लक्ष्य केलंय. एवढंच नव्हे तर, त्याला देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह इतर शहरांमध्ये हिंसाचार पसरवायचा आहे. दरम्यान, एनआयएनं दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, टायगर मेमन यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. एएनआयनं सांगितलं की, दाऊद  इब्राहिमनं आर्म्स स्मगलिंग, नार्को टेररिझम, अंडरवर्ल्ड क्रिमिनल सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, बनावट भारतीय चलन आणि जमीन हडप यांसारखी सर्व बेकायदेशीर काम करतो. यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर तो आतंकी संघटनांसोबत काम करण्यासाठी करतो.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Embed widget