एक्स्प्लोर
Advertisement
'मला बाजू मांडू दिली नाही', सायरस मिस्त्रींचं टाटा संचालक मंडळाला पत्र
मुंबई: टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर पहिल्यांदाच सायरस मिस्त्री यांची कथित बाजू समोर येते आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई-मेल करुन आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात येत आहे.
या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसंच आपल्याला कधीच कामाचं स्वातंत्र्य मिळालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
असंही म्हटलं जात आहे की, सायरस यांनी तब्बल 5 पानी मेल लिहला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, या निर्णयानं त्यांना फार धक्का बसला आहे. आणि ग्रुपला देखील याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कारण की, टाटा समूहाला १ लाख १८ हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं.
अशा पद्धतीनं आपल्याला पदावरुन काढून टाकल्यानं आपल्या इमेजला धक्का बसल्याचं सायरस यांचं म्हणणं आहे. तसेच आपल्या बाजूही मांडू दिलं नसल्याचं सायरस यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
टेलिव्हिजन
Advertisement