एक्स्प्लोर

आधार अनिवार्यतेची सुप्रीम कोर्टातील सद्यपरिस्थिती काय?

आधार अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या आहेत. यावर सध्या सुनावणी सुरु असून कोर्टाने 10 मे रोजी निकाल राखीव ठेवला होता.

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी आपला आधार नंबर जाहीरपणे शेअर करत याबाबतची कोणतीही माहिती हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं. फ्रान्सच्या एका हॅकरने ते आव्हान स्वीकारत आधारशी लिंक असलेला त्यांचा मोबाईल नंबरच ट्विटरवर शेअर केला. हॅकरने आधारशी लिंक असलेला हा नंबर हॅक करुन शोधला असल्याचा दावा केला असला तरी आर. एस. शर्मा यांचा मोबाईल नंबर अगोदरपासूनच पब्लिक डोमेन आहे, जो ट्रायच्या वेबसाईटवर आहे. त्यामुळे हॅकरने कोणतीही नवीन माहिती किंवा या आधारशी लिंक असलेले बँक अकाऊंट शोधले नाही, असा दावा आर. एस. शर्मा यांनी केला. आधारची माहिती अत्यंत सुरक्षित असल्याचं आधार प्राधिकरणाकडून नेहमीच सांगण्यात येतं. शिवाय शर्मा यांच्या आधार कार्डची कोणतीही माहिती हॅक झालेली नाही, असं स्पष्टीकरणही आधार प्राधिकरणाने दिलं नाही. अनेक कल्याणकारी योजनांसाठी आधार अनिवार्य करण्यात आलेलं आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सध्या सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या परिस्थितीचा आढावा... 10 मे रोजी निकाल राखीव ठेवला आधार कार्ड योजनेला आव्हान देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाने 10 मे रोजी सुनावणी पूर्ण करुन निकाल राखीव ठेवला होता. 17 जानेवारी रोजी कोर्टात सुनावणी सुरु झाली. या याचिकांवर जवळपास 38 दिवस सुनावणी सुरु होती. आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स घेणं हे गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. आधार कार्ड नोंदणी करणं अनिवार्य केलेलं नसलं, तरी अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मात्र आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आधार नोंदणीही अनिवार्यच आहे. बायोमेट्रिक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा या याचिकांवर सुनावणी सुरु असताना सरकारकडूनही बाजू मांडण्यात आली. आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे स्वतः कोर्टात हजर झाले आणि आपली बाजू मांडली. आधार नंबर हा एक ठराविक नंबर असून एका व्यक्तीसाठी एकच नंबर जारी केला जाऊ शकतो. हा नंबर रँडम असल्याने व्यक्तीचं नाव, शहर, राज्य काहीही माहिती केलं जाऊ शकत नाही, असं पांडे यांनी सांगितलं. शिवाय बायोमेट्रिक पूर्णपणे सुरक्षित असून त्याची चोरी करणं अशक्य असल्याचा दावा त्यांनी केली. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरु आहे. बायोमेट्रिक डेटा भारतात आधारसाठी देणं आणि अमेरिकेच्या व्हिसासाठी देणं यात फरक काय आहे, असाही सवाल कोर्टाने केला होता. आधार योजना गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं याचिकाकर्त्यांनी सिद्ध केल्यास कोर्ट यात दखल देईल, असं कोर्टाने म्हटलं होतं. संबंधित बातमी : ट्रायचे चेअरमन शर्मांनी आधार हॅकचं चॅलेंज दिलं, हॅकरने हॅक करुन दाखवलं!

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी 29 ऑक्टोबरला ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Embed widget