एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोटगीत पत्नीला पाचशे-हजारच्या नोटा, पतीला तुरुंगवास
कोलकाता : पत्नीला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याची सोय कोलकात्यातील एका वृद्धाने केली. मात्र त्याचवेळी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांची जमवाजमव केलेल्या वृद्धाला कोर्टाने चांगलंच धारेवर धरलं. कोलकात्यातील फॅमिली कोर्टाने 70 वर्षीय इसमाला न्यायालयील कोठडी बजावली आहे.
चलनातून बाद झालेल्या नोटा पोटगीच्या रुपात दिल्याच्या आरोपातून न्यायालयाने वृद्धाला शिक्षा सुनावली आहे. जोपर्यंत पोटगीची पूर्ण रक्कम चुकती केली जात नाही, तोपर्यंत सुटका करणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
कोलकात्यात राहणारा निवृत्त अभियंता गेल्या काही वर्षांपासून पत्नीशी विभक्त होण्याची केस लढवत आहे. दरमहा आठ हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून त्यांनी एकही पैसा दिलेला नाही. ही थकित रक्कम नोव्हेंबर महिन्यात अडीच लाखांच्या घरात पोहचली.
वारंवार सांगूनही पैसे न दिल्यामुळे फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना 8 नोव्हेंबरला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीच्या भावाने दोन लाख रुपये एकरकमी देण्याची सोय केली. मात्र त्यामध्ये पाचशे-हजारच्या बहुतांश नोटांचा समावेश होता. त्याचवेळी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला.
नव्या नोटांची जुळवाजुळव करण्याशिवाय कुटुंबीयांकडे पर्याय नाही. जेव्हा त्यांनी चेक किंवा डिमांड ड्राफ्टने पैसे देण्याचा मार्ग सुचवला, तेव्हा पत्नीने यालाही नकार दिला. त्यावेळी चलनात असलेल्या नोटांची सोय होईपर्यंत वृद्धाला न्यायालयीन कोठडीतच रहावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement