एक्स्प्लोर
एका दिवसात 3 लाख लोकांकडून मोदी अनफॉलो!
नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. परंतु काहींनी या निर्णयाचा विरोधही केला. ट्विटरवर मोदींवर कडाडून विरोध होतं. परिणामी एका दिवसात तब्बल तीन लाख ट्विपल्सनी पंतप्रधान मोदींना अनफॉलो केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याचं 8 नोव्हेंबरला रात्री जाहीर केलं. त्याचे पडसाद ट्विटरवर पाहायला मिळाले. ट्विटर काऊंटरच्या माहितीनुसार 9 नोव्हेंबर रोजी 3.13 लाख ट्विटराईट्सनी मोदींना अनफॉलो करुन या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांच्यापेक्षाही त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. शिवाय सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. तसंच मोस्ट पॉप्युलर ट्विटर युझरमध्ये मोदी जगात 47 व्या क्रमांकावर आहे.
मोदी ट्विटरवर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. नोव्हेंबर महिन्यात ट्विटरवर मोदींचे फॉलोअर्स दिवसाला 25 हजारांनी वाढले होते. शिवाय ज्या दिवशी 500-1000 नोटांबाबत निर्णय झाला, त्यादिवशीही त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत 50 हजारांनी वाढले होते. पण निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत तब्बल तीन लाखांनी घट झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement