Bitcoin Currency : जर तुम्हीही क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना अर्थमंत्रलायने म्हटलेय की, ‘केंद्र सरकार बिटकॉइन संदर्भात कोणताही डेटा एकत्र करत नाही. तसेच बिटकॉईनला देशात अधिकृत चलन म्हणून मान्यता देण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही.’


बिटकॉईन व्यवहारासंदर्भात केंद्र सरकार कोणतीही माहिती एकत्र करत नाही. तसेच बिटकॉईनला देशात अधिकृत चलन म्हणून मान्यता देण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती अर्थमंत्रालयाने (Ministry of Finance ) लोकसभेत (Lok Sabha ) लिखीत स्वरुपात दिली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.  क्रिप्टो करन्सीसोबतच एकूण 26 नवी विधेयकं सरकार या अधिवेशनात मांडणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार आहे. त्यापूर्वीच बिटकॉईनला देशात अधिकृत चलन म्हणून मान्यता देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे अर्थ मंत्रलायनं सांगितलं आहे. 


महिन्यात एखाद्याला कोट्यधीश करणारी, तर काही जणांना कंगालही करणारी म्हणजे क्रिप्टोकरन्सी. सध्या जगभरातल्या आर्थिक वर्तुळाक क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. मात्र केंद्र सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीला चाप लावून, भारताचं अधिकृत डिजिटल आणि आभासी चलन आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातेय. आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे.  






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या : 
Cryptocurrency: तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असली तरी घाबरण्याची गरज नाही!
Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीबाबत अफवांवर विश्वास ठेऊन त्याची विक्री करु नका, कंपन्यांचे आवाहन
Cryptocurrency : आरबीआयची डिजिटल करन्सी क्रिप्टोकरन्सीपासून वेगळी कशी? जाणून घ्या
बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता, बँक ऑफ इंग्लंडच्या डेप्युटी गव्हर्नरांनी व्यक्त केली भीती