Cryptocurrency: भारत सरकार सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयकांपैकी एक विधेयक हे क्रिप्टोकरन्सीच्या नियमांवरही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार आहे.

Continues below advertisement

दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती क्रिप्टोकरन्सी माईन (Mining) करू शकणार नाही. कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी किंवा होल्ड, विक्री किंवा व्यवहार करू शकणार नाही किंवा क्रिप्टोकरन्सी इतर कोणाला इश्यू करू शकणार नाही, हस्तांतरित करू शकणार नाही किंवा ते डिस्पोज (Dispose) करु शकणार नाही.

पण ज्यांच्याकडे सध्या क्रिप्टोकरन्सी आहेत त्यांना पोझिशन मधून बाहेर पडण्यासाठी निश्चित वेळ दिला जाईल. त्यामुळं जर तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असेल तर तुम्ही ती आता सरकारने दिलेल्या वेळेत विकू शकता. सूत्रांचे म्हणण्यानुसार, ज्या लोकांनी आपले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये ठेवले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सरकार वेळ देऊ शकते.

Continues below advertisement

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ते हॅक करता येत नाही?क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे विकेंद्रित प्रणाली आहे. यावर कोणतेही सरकार किंवा कंपनीचे नियंत्रण नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि वितरित प्रणालीवर हस्तांतरित केलेली क्रिप्टोकरन्सी अत्यंत सुरक्षित मानली जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणीही ते हॅक करू शकत नाही आणि त्याच्या डेटाशी छेडछाड करणं शक्य नाही, कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये जगभरातील कनेक्ट केलेल्या उपकरणांवर प्रत्येक माहिती उपलब्ध आहे. जर छेडछाड करायची असेल, तर जगभरातील सर्व ब्लॉकचेन-कनेक्टेड संगणकांवर बदल करावे लागतील, जे शक्य नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-