मुंबई : यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये जवळपास 26 विधेयकं सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. ज्यात क्रिप्टोकरन्सीचे विधेयक (cryptocurrency bill) सादर होणार असल्याने यंदा अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर विस्तारित चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी खाजगी क्रिप्टोकरन्सीवर (Private cryptocurrency) बंदी घालण्यासाठी एक विधेयक आणलं जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. ज्यानंतर एक नवा संभ्रम सध्या भारतीय क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे.


यामुळेच काही गुंतवणूकदारांनी भीतीपोटी त्यांच्याकडील कॉईन्स विकण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती जवळपास 15 टक्क्यांनी पडल्या आहेत. ज्यानुसार बीटकॉईनची (Bitocoin) किंमत अंदाजे 18.53 टक्क्यांनी, इथेरियमची 15.58 टक्क्यांनी आणि टेथरची (Tether) 18.29 टक्क्यांनी उतरली आहे. यानंतर घाबरलेल्या गुंतवणूकदारांना धीर देत घाबरुन अशाप्रकारे त्यांनी विक्री करु नये, असं आव्हान काही क्रिप्टो करन्सी कंपन्यांनी केलं आहे. 


अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं 


या सर्वाबाबत वजिरएक्सचे (WazirX) संस्थापक निश्चाल शेट्टी (Nischal Shetty) यांनी एबीपीशी बोलताना सांगितले की,"हिवाळी  अधिवेशनातील क्रिप्टोकरन्सीच्या या निर्णयामुळे सर्व संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यामुळे भारताच्या क्रिप्टो करन्सीच्या जागतिक मार्केटमधील स्थानावरही परिणाम झाला आहे. तसंच सध्यातरी रुपये हेच भारतातील मुख्य चलान असून क्रिप्टोला एक मुख्य चलान होण्याकरता अजून वेळ आहे. पण आता संसदेत हा विषय निघाल्याने लवकरच याबाबत महत्त्वाचे निर्णय होतील. आपल्याला फक्त भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे."


खाजगी क्रिप्टोकरन्सीवरील बंदी धोकादायक


सध्या भारतात क्रिप्टोकरन्सीधारक दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेकांनी यात गुंतवणूक केली असून अशाप्रकारे अचानक खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातल्याने मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. तसंच असं करायचा प्रयत्न केल्यास घाबरुन गुंतवणूकदार चुकीच्या मार्गाने पैसे गुंतवूण यामुळे भ्रष्टाचार आणि काळा पैसा यालाच वाव मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया कॅशा कंपनीचे संस्थापक कुमार गौरवर यांनी एबीपीला दिली. क्रिप्टोकरन्सीमध्ये लवकरच नवे बदल झेब पेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश शेखर यांनी याबाबत एबीपीशी बोलताना सांगितले की,'आगामी हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर चर्चा झाल्यानंतर गुंतवणूकदार आणि त्यांच्या गरजा तसंच भारतातील क्रिप्टोकरन्सीची नेमकी परिस्थिती सर्वच स्पष्ट होईल.'



हे ही वाचा


Cryptocurrency : नव्या क्रिप्टो करन्सी विधेयकात खाजगी क्रिप्टो करन्सीवर बंदी! हिवाळी अधिवेशनात विधेयकावर चर्चा


बॉलिवूडमध्येही क्रिप्टोकरन्सीचा दणक्यात प्रवेश, अमिताभ बच्चन Coin DCX चे ब्रँड अँबेसेडर  


India on Cryptocurrency: पुढील अर्थसंकल्पात क्रिप्टोचे नियमन करणार भारत सरकार, बंदीचा विचार नाही : रिपोर्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha