एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधानांना लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी युवराज सिंह संसदेत
नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंहनं पंतप्रधान मोदींना लग्नाची आमंत्रण पत्रिका दिली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री हेझल कीचसोबत 30 नोव्हेंबरला युवराज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आमंत्रण करताना युवराजच्या मातोश्रीही सोबत होत्या.
आधी गुरुद्वारामध्ये युवराज आणि हेजलचं लग्न होणार आहे. त्यानंतर चंदीगडच्या ललित हॉटेलमध्ये शानदार रिसेप्शन असेल. या लग्नाला मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेटी हजर राहण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपासून युवराज आणि हेझल एकमेकांना डेट करत आहेत. युवराज आणि हेझल यांचा साखरपुडा नोव्हेंबर 2015 मध्ये झाला होता. बालीमध्ये सुट्टीवर गेलं असताना त्यांनी साखरपुडा केला होता. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या हेझलने 2011 मध्ये 'बॉडीगार्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
मागील अनेक महिन्यांपासून युवराज टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, त्याने आतापर्यंत 293 वनडेत भारतासाठी प्रतिनिधित्व केलं असून 8329 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. तर 13 शतकं आणि 51 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement