एक्स्प्लोर

New covid19 Vaccine : रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी 

Sputnik V : रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे.  

Sputnik V :  संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी सध्या दिल्या जात आहेत. यात आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. 

औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे.  नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे.  

डॉ. रेड्डीजने स्पुटनिक V लस भारतामध्ये आणण्यासाठी 'रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड' यांच्यासोबत करार केला आहे.  भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे. 

Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला

भारतात सध्या स्थानिक पातळीवर कोविडच्या दोन लस तयार केल्या जातात. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या लसींचा समावेश आहे. यानंतर आता स्पुटनिक V (डॉ. रेड्डी यांच्या सहकार्याने) या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. तर जॉनसन आणि जॉनसन सहकार्याने बायोलॉजिकल ई, नोवॅवॅक्स लस (सीरम इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहकार्याने तसे झाइडस कॅडिलाची लस आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल या लसींना देखील परवानगी मिळू शकते.  

स्पुटनिक V  चे लस घेतल्यानंतर 2 महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला

'स्पुटनिक V ' चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणाच्या बाबतीत रशियाने जगात बाजी मारली आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यास सुरुवात झालीय. रशियाच्या या सल्ल्याने आता मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाल्याचं दिसतंय. कोरोनाची लस घेतल्यानंतर दारुचे सेवन न करण्याच्या सल्ल्यामागे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश आहे असं रशियाच्या प्रशासनानं स्पष्ट केलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Embed widget