Covid19 Updates : देशात 226 नवीन कोरोनाबाधित; महाराष्ट्रात कोविड लसीकरणात तिपटीने वाढ, कोरोनाचा धोका पाहता खबरदारीचा उपाय
Covid19 Vaccination : कोरोनाचा धोका पाहता कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरणाची आकडेवारी तीन पटीने वाढली आहे.
Covid 19 Vaccination Hike : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरणात (Covid Vaccine) महाराष्ट्रात तिपटीने वाढ झाली आहे. येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढणार असल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्याचे तसेच कोरोना लस (Covid19 Vaccination) आणि बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीमध्ये तीन पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जगभरात चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली, तरी सरकारकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
देशात 263 नवीन कोरोनाबाधित
भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने आज नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 263 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या 3 हजार 653 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
कोरोना लसीकरणात तीन पटीने वाढ
कोरोनाचा धोका आणि जागतिक स्तरावर कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यभरातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या दररोज सुमारे 10,000 लसींचे डोस देण्यात येत आहेत. कोविड लसीकरणामध्ये गेल्या आठवड्या दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण सुमारे 3,000 होते. आता लसीकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शासकीय कोविड लसीकरण केंद्रांमध्ये सध्या कोवॅक्सिन (Covaxin) उपलब्ध आहे. कोविशिल्ड (Covidshield) आणि कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीचा साठा महिनाभरापूर्वीच संपला आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरणात तीन पटीने वाढ झाली आहे तर, खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या संख्येत 10 पट वाढ झाली आहे.
दररोज सुमारे 10,000 लोकांचे लसीकरण
महाराष्ट्र राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, 'एका आठवड्यापूर्वी दैनंदिन कोरोना लसीकरणाचा आकडा सुमारे 3,000 पर्यंत होता. पण जगभरात इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाहता, लोक खबरदारी म्हणून लसीकरणा करण्याकडे वळत आहेत. सध्या राज्यभरात दररोज सुमारे 10,000 लोकांचे लसीकरण केले जात आहे.' देसाई यांनी पुढे सांगितले की, 'आमच्याकडे कोवॅक्सिन (Covaxin) चे 17 लाख डोसचा साठा आहे आणि आम्हाला केंद्र सरकारकडे कोविशिल्ड (Covidshield) आणि कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसी मागवल्या आहेत.