(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार राज्यात आज आणि उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम
देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचवण्यासाठी आजपासून मेगा तयारी केली जाणार आहे. चार राज्यातील पाच ठिकाणी आज आणि उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे.
नवी दिल्ली : आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे. सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
यावेळी लस देण्यासाठी प्रामुख्याने तयार केलेलं Co-WIN अॅपची ऑपरेशनल फीसिबिलिटी, फील्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासचं जाईल. ही एक रंगीत तालीम असेल. लसीकरणाच्या वेळी जे केलं जातं ते सगळं यावेळी केलं जाईल, पण लस मात्र दिली जाणार नाही.
आज आणि उद्या काय घडणार? आज पहिल्या दिवशी लसीकरणासाठी लागणारी पूर्वतयारी केली जाईल. यासाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील. यात Co-Win अॅपवरील नोंदणी, लसीकरण मोहिम राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारीचं वाटप, ब्लॉक स्तरावरील लस वाहतुकीच्या साधनांची तयारी अशा बाबींचा समावेश असेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या प्रत्यक्ष लसीकरण कसे केले जाईल याची रंगीत तालीम घेतली जाईल.
तीन टप्प्यात ड्राय रन या ड्राय रनमध्ये चारही राज्यांत मिळून एकूण 125 आरोग्य सेवक लसीकणाचे लाभार्थी म्हणून सहभाही होणार आहेत. ही ड्राय रन नोंदणी, मायक्रोप्लॅनिंग आणि प्रत्यक्ष लसीकरणाचं ड्राय रन या तीन टप्प्यांमध्ये होईल. या ड्राय रन मध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सआधारे राज्य आणि जिल्हा टास्क फोर्स सहभागी होतील. चार राज्यांतील ड्राय रन जिल्हा हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज इथे राबवली जाईल.
ऑपरेशनल गाईडलाईन्सनुसार, ड्राय रन दरम्यान
- प्लॅनिंग आणि तयारी करणं
- Co Win अॅपची टेस्टिंग करुन आलेला हेल्थ केअर वर्करची माहिती अपलोड करणं
- सेशन प्लॅनिंग आणि वॅक्सिनेटर डिप्लॉयमेंट.
- लसीकरण साईटवर लस आणणं आणि लॉजिस्टिक तपासणं. ते Co Win अॅपद्वारे देणं
- सेशन साईटवर लसीकरण करणं आणि अहवाल तयार करणं
- यानंतर ब्लॉक, जिल्हा आणि राज्याला आढावा बैठक घेऊन अभिप्राय द्यावं लागेल. जर त्रुटी असतील तर त्याची नोंद करणं.
- ड्राय रनसाठी वॅक्सिनेटरसाठी (ANM) Co-WIN ची (www.Uat.co-vin.in) आणि (www.app.uat.co-vin.in) परीक्षण लिंक तयार ठेवली जाईल.
एका सत्रासाठी 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद पाच सत्र असलेल्या ठिकाणी प्रत्येक ड्राय रनसाठी 25 आरोग्य सेवकांची लाभार्थी म्हणून करण्यात आली आहे. ड्राय रन सेशन साईटवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती साईटवर असेल. यावेळी Co-WIN अॅपद्वारे एसएमएसचीही तपासणी होईल, ज्यात पुढील लसीकरणाची माहिती असेल. लाभार्थ्यांसह (आरोग्यसेवक) सेशन फ्लोचं आकलन होईल. या दरम्यान कोणतीही लस दिली जाणार नाही. परंतु लसीकरणाच्या वेळी जी प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया पाडली जाईल.
सर्वात आधी 25 डमी आरोग्य कर्मचारी दोन तासात या साईटवर येतील. यानंतर लसीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या नावाची यादी तपासेल. दुसरा अधिकारी ही नावं Co-WIN अॅपद्वारे पडताळणी करेल. यानंतर लसीकरण अधिकारी Co Win अॅपवर लसीकरणाची माहिती भरेल.
Co Win अॅपवर दुष्परिणामाच्या घटनेची नोंद तिसरा आणि चौथा लसीकरम अधिकारी हा गर्दीच्या नियंत्रणाचं काम करेल, IPC (इंटर प्रोसेस कम्युनिकेशन) मेसेजिंग, वॅक्सिनेटरचं समर्थन करेल. लसीकरणानंतर लाभार्थी 30 मिनिटांची प्रतीक्षा करतील. यादरम्यान दोन किंवा तीन adverse effect following immunization म्हणजेच लस लागल्यानंतर जर कोणताही दुष्परिणामाची घटना घडली तर त्याची सेशन साईटवरुन Co Win अॅप माहिती दिली जाईल.