(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus in Goa : गोव्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवा; काँग्रेसची मागणी
कोरोना विषाणूचा वाढता धोका आणि रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता शुक्रवारपासून गोव्यात 4 दिवसांचा लॉकडाऊनच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Coronavirus in Goa गोव्यातही मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता प्रशासनाने कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोव्यात सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करावी अशीही मागणी केली आहे.
गोव्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं लक्षात येताच प्रशासनाकडून येथे शुक्रवारी लॉकाऊन लागू करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून सुरु झालेला हा लॉकडाऊन सोमवारपर्यंत कायम असणार आहे. पण, परिस्थिती अद्यापही नियंत्रणात येत नसल्यामुळे विरोधकांकडून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
'परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळं कठोर निर्बंध लागू करत कडक लॉकडाऊन हा एकच अंतिम पर्याय उरला आहे', असं काँग्रेस नेते दिगंबर कामत म्हणाले. राज्य शासनाने 100 कोटींच्या मदत निधीची घोषणा करत नागरी सेवा आणि लष्करातील काही तज्ज्ञांच्या मदतीने राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्याचीही मागणी केली. शिवाय त्यांच्या हाती राज्यातील कोरोनाची परिस्थिती सोपवण्याचा आग्रही सूर त्यांनी आळवला.
हे अती होत आहे, निष्पाप जींवांशी आणखी खेळायला नको, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी चिंता व्यक्त केली. सोबतच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मान्सूनच्य़ा काळात या परिस्थितीचा गंभीर वळण मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. वारंवार वीजपुरवठा खंडीत होणं, रस्त्यांची दुरवस्था, पूरस्थिती या साऱ्या अडचणीच्या परिस्थितीवर मात करणं गरजेचं असल्याचं म्हणत अन्यथा याचे परिणाम कोविड व्यवस्थापनावर होऊ शकतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे इस्रायलमधून भारतासह इतर सात देशांत जाण्यास बंदी
शनिवारी गोव्यात 2,303 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळं कोरोना गोव्यातील एकूण आकडा 93,355 वर पोहोचला असून, एकूण मृतांची संख्या 1222 वर पोहोचला आहे.