एक्स्प्लोर
Advertisement
मेट्रोत मिठी मारणाऱ्या जोडप्याला सहप्रवाशांची मारहाण
कोलकाता मेट्रोमधून प्रवास करणारं एक जोडपं मिठी मारण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सहप्रवाशांनी त्यांना चक्क मारहाण केली.
कोलकाता : एकीकडे बिहारमध्ये भररस्त्यात तरुणीचे कपडे उतरवून तिची छेड काढली जात होती, तेव्हा अनेक बघ्यांनी तिच्या मदतीची तसदीही न घेता व्हिडिओ शूटिंग करण्यात धन्यता मानली, तर दुसरीकडे कोलकात्यामध्ये परस्पर संमतीने एका जोडप्याने मारलेलं आलिंगन सहप्रवाशांना बघवलं नाही. कोलकाता मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या या जोडप्याला सहप्रवाशांनी चक्क मारहाण केली.
एका बंगाली वृत्तपत्राच्या पत्रकाराने सोमवारी 'याचि देहि याचि डोळा' पाहिलेला हा प्रसंग वर्णन केला आहे. सोबतच या मारहाणीचे फोटोही त्याने पोस्ट केले आहेत. कोलकाता मेट्रोमधून प्रवास करणारं संबंधित जोडपं एकमेकांना खेटून उभं होतं. मात्र त्यांना सहप्रवाशांच्या 'मॉरल पोलिसिंग'चा फटका बसला. हे वर्तन अनुचित असल्याचं म्हणणाऱ्या काही सहप्रवाशांसोबत दोघांचे खटके उडाले.
हा पब किंवा बागबगिचा नाही, असा टोला एका वृद्धाने लगावला, तर एका प्रवाशाने दोघांना रुम बूक करण्याचाही अनाहुत सल्ला दिल्याचं म्हटलं जातं.
तरुण आणि तरुणी डमडम मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर काही जणांनी त्यांना जबरदस्त मारहाण केली. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तरुणी मध्ये पडली, तरीही मारहाण थांबली नाही. उलट, या तरुणीलाही सहप्रवाशांकडून 'प्रसाद' मिळाला. काही तरुणांच्या मध्यस्थीनंतरच या जोडप्याची सुटका झाली.
'मेट्रोत गर्दी असल्यामुळे विशीतील तरुण आणि त्याची मैत्रिण ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसनाजवळ उभे होते. गर्दीपासून रक्षणासाठी तरुण तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता' असा दावा प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने केला आहे.
या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल न झाल्यामुळे मेट्रो रेल प्राधिकरणाने चौकशी करण्यास नकार दिला आहे. 'मेट्रो स्थानकावरील सुरक्षा अधिकारी किंवा सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेबाबत कुठलीच दृष्यं दिसत नाहीत. याची माहिती देणाऱ्या पत्रकाराकडेही या घटनेचा व्हिडिओ नाही. त्यामुळे तपास करु शकत नाही' असं मेट्रो रेलच्या सीपीआरओ इंद्राणी बॅनर्जी यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement