Coronavirus | देशात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात एक लाख 45 हजार नव्या रुग्णांची भर
Coronavirus : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून अॅक्टिव्ह केसची संख्या 10 लाखांवर गेली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या चोवीस तासात देशात एक लाख 45 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 794 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा लाखांच्या वर गेली आहे.
गेल्या चोवीस तासात 77,567 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने दर दिवशी एक लाखांचा टप्पा ओलांडल्याचं दिसत आहे.
देशातील कोरोनाची स्थिती
- एकूण कोरोना रुग्ण संख्या - एक कोटी 32 लाख 5 हजार 926
- एकूण डिस्चार्ज- एक कोटी 19 लाख 90 हजार 859
- एकूण अॅक्टिव्ह केस- 10 लाख 46 हजार 631
- एकूण मृत्यू- एक लाख 68 हजार 436
- एकूण लसीकरण- 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 डोस
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात शुक्रवारी 58, 993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन 45391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 534603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे. गुरूवारी 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात शुक्रवारी 301 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं 57,329 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर राज्यात 5,34,603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 2,16,31,258 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी 5506 रुग्णाची भर पडली होती. आतापर्यंत दिल्लीमध्ये 6,98,008 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 11,157 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :