Coronavirus Update : गेल्या 24 तासात देशात 29 हजार रुग्णांची भर; एकट्या केरळमध्ये 18 हजार रुग्ण सापडले
India Coronavirus Updates : देशातील गेल्या 24 तासात सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 60 टक्क्याहून अधिक रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये सापडली आहे.
India Coronavirus Updates : भारतात कोरोना रुग्णसंख्येत जरी चढ-उतार दिसत असला तरी सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू मंदावताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 29,616 रुग्णांची नोंद झालीय तर 290 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 28,046 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकट्या केरळमध्ये शुक्रवारी 17,983 रुग्णांची नोंद झाली आहे तर 127 लोकांचा मृत्यू झाला.
त्या आधी गुरुवारी देशात 31,382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 318 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत कोरोनाचे 84.89 कोटी इतक्या प्रमाणात डोस देण्यात आले आहेत.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 51 जणांचा मृत्यू
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 36 लाख 24 हजार 419
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 28 लाख 48 हजार 273
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख एक हजार 442
- एकूण मृत्यू : चार लाख 46 हजार 658
- देशातील एकूण लसीकरण : 84 कोटी 89 लाख 29 हजार 160 डोस
Covid Vaccination: आता 'या' लोकांना घरी जाऊन कोरोना लस दिली जाणार, सणांसाठी गाईडलाईन्स जारी
गेल्या सात दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण
19 सप्टेंबर : 30,256 रुग्ण
20 सप्टेंबर : 26,115 रुग्ण
21 सप्टेंबर : 26,964 रुग्ण
22 सप्टेंबर : 31,923 रुग्ण
23 सप्टेंबर : 31,382 रुग्ण
24 सप्टेंबर : 29,616 रुग्ण
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात आज 51 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतेय
मुंबईत 24 तासात 446 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासात बरे झालेले रुग्ण 430 आहेत. शहरात आतापर्यंत 716941 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% आहे. सध्या शहरात एकूण सक्रिय रुग्ण 4809 इतर आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे. कोविड वाढीचा दर (17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर) 0.06% इतका आहे.