(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Today : 24 तासांत 11 हजार 850 नवीन रुग्ण; 555 जणांचा मृत्यू
Coronavirus Today : मागील 24 तासांत देशात 11 हजार 850 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 555 जणांचा मृत्यू झालाय.
Coronavirus Today : देशातील कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 11 हजार 850 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 555 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार 36 इतकी झाली आहे.
केरळनं देशाची चिंता वाढवली –
केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावं घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या एकूण कोरोना रुग्णांच्या 50 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये 6,674 नवे रुग्ण आढळले आहेत. केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे.
4 लाख 63 हजार 245 जणांचा मृत्यू –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी 44 लाख 26 हजार 36 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्यामध्ये घट झाली आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार 308 इतकी झाली आहे. कोरोना महामारीमध्ये देशात आतापर्यंत चार लाख 63 हजार 245 जणांचा मृत्यू झालाय.
3,38,00,925 जणांची कोरोनावर मात –
सलग 36 दिवसांपासून देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांखाली तर सलग 139 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 0.40 टक्के इतकी आहे. मार्च 2020 नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 26 हजार 483 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के इतका झालाय.
111 कोटी डोस –
कोरोनाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 111 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशात 58 लाख 42 हजार 530 जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 111 कोटी 40 लाख 48 हजार 134 लसीचे डोस देण्यात आले आहेत.