Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नवे कोरोनाबाधित, देशाचा रिकव्हरी रेट 97.22 टक्क्यांवर
Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 724 रुग्णांचा मृत्यूदेशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात, रिकव्हरी रेट 97.22 टक्क्यांवर
Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल (रविवारी) 39 हजार 649 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रिकव्हरी रेट वाढून आता 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण 43 कोटी 23 लाख 17 हजार सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार (ICMR), भारतात कोरोनाचे 14 लाख 32 हजार 343 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 43 कोटी 23 लाख 17 हजार 813 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापूर, सांगली अजूनही हॉटस्पॉट
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.
कोल्हापूर, सांगलीत रुग्णसंख्या कमी होईना
कोल्हापूर जिल्ह्यात आज 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दोन जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या शून्यावर
आज नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात सगल दुसऱ्या दिवशी एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळेलेला नाही. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, धुळे या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 अश्या संख्येत रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
महाराष्ट्राची कोरोनाची सद्यस्थिती :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यादरम्यान, 6,013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 156 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एकूण कोरोना रुग्ण : 61,57,799
आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्ण : 59,12,479
कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू : 1,25,878
सध्याची सक्रिय रुग्णसंख्या : 1,16,165
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 15 जणांचा कोरोनाने जीव गेला. मुंबईत आतापर्यंत 15 हजार 627 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत 11 हजार 423 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Vaccination : तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आजपासून लसीकरण सुरु