Coronavirus : होळीवर कोरोनाचं सावट! एका आठवड्यात तीन पटीने वाढले कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 100 च्या पुढे
India Covid-19 Cases : होळीच्या सणाआधी देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
India Coronavirus Updates : ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाचं (Covid 19 Updates) संकट वाढत आहे. देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. 8 फेब्रुवारीला होळी (Holi 2023) आहे. देशभरात होळी सण मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात येईल. मात्र यावेळी कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
होळी आधी पुन्हा कोरोनाचं संकट
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागील आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येतच झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहेत.
देशात 324 नवीन कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.
कोरोनामुळे पाच लाखहून अधिक रुग्णांचा मृत्यू
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे सरकार आणि नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वाढली आहे. आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 30 हजार 775 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून केरळमध्येही एक एक दगावल्याची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 4,46,87,820 लोकांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी चार कोटूहून अधिक लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
देशात लसीकरणावर भर
भारताने कोरोना काळात लसीकरणावर विशेष भर दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड प्रतिबंधात्मक लसींचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत 220.63 कोटी कोरोना लसींचे डोस भारतात देण्यात आले आहेत. 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक होती. 23 ऑगस्ट 2020 रोजी ही संख्या 30 लाखांच्या पुढे तर 5 सप्टेंबरपर्यंत 40 लाखांच्या पार पोहोचली होती. 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 90 लाखांच्या पुढे पोहोचला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :