![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhumi Pujan | भूमीपूजनादरम्यान पंतप्रधान मोदींचं सोशल डिस्टन्सिंग
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करताना दिसून आले.
![Bhumi Pujan | भूमीपूजनादरम्यान पंतप्रधान मोदींचं सोशल डिस्टन्सिंग Coronavirus pm modi reaches ayodhya quick prayer at hanuman garhi maintain social distancing Bhumi Pujan | भूमीपूजनादरम्यान पंतप्रधान मोदींचं सोशल डिस्टन्सिंग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/05202003/modi-Ayodhya01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथ राम मंदिराचं भूमिपूजन केलं. यादरम्यान नरेंद्र मोदी सोशल डिस्टंन्सिंगचं काटेकोरपणे पालन करताना दिसले. विमानतळावर उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी काळजी घेताना दिसले. विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना नरेंद्र मोदी यांनी लांबूनच नमस्कार केला. त्यानंतर ते हनुमानगढी येथे दर्शनासाठी गेले. येथे जवळपास 10 मिनिटांपर्यंत भगवान हनुमानाची आरती केली. मोदींनी हनुमानगढी येथे प्रवेश करताना आपले हात सॅनिटाईज केले होते. तसेच मोदींच्या हातात देण्यात आलेलं आरतीचं ताट देण्यााधीही सॅनिटाईज करण्यात आलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोदींच्या कपाळावर टिळाही लावण्यात आला नाही. तसेच त्यांनी प्रसादही देण्यात आला नाही. दरम्यान, पंतप्रधान यांनी हनुमानगढी येथे आपल्यातर्फे दानही केलं.
हनुमानगढीत दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमी स्थळी पोहोचले. यादरम्यान मोदींनी फेस मास्क लावला होता. त्यांच्यासोबत असलेल्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही चेहऱ्यावर मास्क लावला होता. पंतप्रधान मोदी यांनी रामललाचं दर्शन घेतलं आणि साष्टांग दंडवतही घातलं. त्यानंतर मोदी राम जन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यादरम्यानही सोशल डिस्टन्सिगचं पालन होताना दिसलं. मोदींसोबत अगदी मोजकेच जण भूमिपुजनासाठी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली.
राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर मोदी सभास्थळी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 29 वर्षांनी अयोध्येत दाखल झाले. याआधी ते 1992मध्ये अयोध्येत गेले होते. त्यावेळी राम मंदिर आंदोलनाचा ते हिस्सा होते. यावेळी मात्र देशाचे पंतप्रधान म्हणून रामललाच्या दर्शनासाठी गेले होते.
प्रभू श्रीरामाचा संदेश जगात आपली जबाबदारी
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूज्यनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल. प्रभू श्रीराम हे सर्वांमध्ये आहेत. ते सर्वांचे आहेत. राम मंदिर अनंक काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Ram Mandir PM Modi Speech: संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली - पंतप्रधान मोदी
- Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
- राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
- Mohan Bhagwat : 30 वर्षांच्या संघर्षाचं फळ मिळालं, संकल्प पूर्ण झाला : मोहन भागवत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)