(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus India Updates : देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 181 मृत्यू
India Coronavirus Updates : देशात काल दिवसभरात 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मंदावण्यास सुरुवात झाली आहे. देशात आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) देशात 18 हजार 132 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
आतापर्यंत 4 लाख 50 हजार 963 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 26 हजार 579 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या 2 लाख 14 हजार 900 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 20 हजार 57 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 963 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल दिवसभरात 65 हजारांहून अधिक लसीचे डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोना लसीचे 65 लाख 86 हजार 92 डोस देण्यात आले. त्यानंतर लसीकरणाचा आकडा वाढून 95 कोटी 89 लाख 78 हजार 49 वर पोहोचला आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत कोरोनाच्या 58 कोटी 50 लाख 38 हजार 43 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी काल 11 लाख 81 हजार 766 चाचण्या करण्यात आल्या.
राज्यात काल (सोमवारी) नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, 1736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 1 हजार 736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 04 हजार 320 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल 36 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.. राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 सक्रीय रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 465 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (5), धुळे (7), जालना (65), परभणी (90), हिंगोली (19), नांदेड (12), अकोला (04), वाशिम (03), बुलढाणा (06), नागपूर (71), यवतमाळ (04), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (14) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.