Corona Update | कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर, रशियाला टाकलं मागे
वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 95 हजार 396 आहे. आज देशात 21 हजार 492 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप भारतीयांची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत, मात्र तितकसं यश अद्याप मिळालेलं दिसत नाही.
वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 95 हजार 396 आहे. तर रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 81 हजार 251 एवढी आहे. मात्र भारताच्या तुलनेने रशियातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या कमी आहे. आज रशियात 6 हजार 736 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका आणि ब्राझील हे दोन आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे आहे, तर ब्राझीलमध्ये ही संख्या 15 लाखांहून अधिक आहे.
या आकडेवारीतील महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बाब म्हणजे, ज्या अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा 29 लाखांच्या पार गेला, तिथे आज एका दिवसात भारतापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. अमेरिकेत आज 17 हजार 900 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर भारतात आज 21 हजार 492 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित टॉप 10 देश- अमेरिका- 29 लाख 53 हजार 670
- ब्राझील- 15 लाख 78 हजार 376
- भारत- 6 लाख 95 हजार 396
- रशिया- 6 लाख 81 हजार 251
- पेरु- 2 लाख 99 हजार 80
- स्पेन- 2 लाख 97 हजार 625
- चिली- 2 लाख 95 हजार
- इंग्लंड- 2 लाख 85 हजार 416
- मॅक्सिको - 2 लाख 52 हजार 165
- इटली- 2 लाख 41 हजार 611
- राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय, कार्यपद्धती निश्चित करणे सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
