(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशात गेल्या 24 तासात 549 कोरोनाबाधित रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 169 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 478 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाबाधितांचा देशातील आकडा 5865 वर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसचे देशभरात 549 रुग्ण आढळले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे, अशा माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 5865 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 169 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 478 जण कोरोनामुक्त झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. देशभरात आतापर्यंत 1 लाख 30 हजार रुग्णांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली आहे.
राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी
- महाराष्ट्र - 1297
- आंध्र प्रदेश - 348
- अंदमान आणि निकोबार - 11
- अरुणाचल प्रदेश - 1
- आसाम - 28
- बिहार 38
- चंदीगड 18
- छत्तीसगड - 10
- दिल्ली - 669
- गोवा - 7
- गुजरात -179
- हरियाणा - 147
- हिमाचल प्रदेश 18
- जम्मू-काश्मीर158
- झारखंड - 4
- कर्नाटक - 181
- केरळ - 345
- लदाख - 14
- मध्य प्रदेश - 229
- मणिपूर - 1
- मिझोरम - 1
- ओडिशा - 42
- पुडुचेरी - 5
- पंजाब - 101
- राजस्थान - 381
- तामिळनाडू- 738
- तेलंगणा - 427
- त्रिपुरा - 1
- उत्तराखंड - 33
- उत्तर प्रदेश - 361
- पश्चिम बंगाल - 103
कोरोनाशी सामना करण्यासाठी रेल्वेही सज्ज झाली आहे. भारतीय रेल्वेने अडीच हजार डॉक्टर्स आणि 25 हजार मेडिकल कर्मचारी नियुक्त केले आहेत. रेल्वेने 5000 रेल्वेच्या डब्ब्यांची व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आली आहे. भारतात 20 खासगी कंपन्या पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किट बनवण्याचं करत आहेत. 49 हजार वेंटिलेटर्सही खरेदी केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
संबंधित बातम्या
- राज्यातही आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- coronavirus | शनिवारपासून नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट बंद
- coronavirus | मांजर पाळताय, खबरदारी घ्या ! मांजरामुळे होऊ शकतो 'कोरोना'
- सोशल डिस्टन्सिंगचं चांगभलं! बँकांना तीन दिवस सुट्या, खातेदारांच्या रांगा