Coronavirus : दिलासादायक! देशात 3011 नवीन कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजार 126
Coronavirus Cases Today : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
![Coronavirus : दिलासादायक! देशात 3011 नवीन कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजार 126 Coronavirus in India Updates India reports 3011 new coronavirus infections and 28 deaths in last 24 hours Coronavirus : दिलासादायक! देशात 3011 नवीन कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजार 126](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/28/e29f5a87da345e4e00e13611b7acf2631661661417448322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 364 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. पण आज 10 कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 28 वर पोहोचली आहे.
मागील काही दिवसातील कोरोनाचा आलेख
- 03 ऑक्टोबर 2022 - 3011
- 02 ऑक्टोबर 2022 - 3375
- 01 ऑक्टोबर 2022 - 3805
- 30 सप्टेंबर 2022 - 3947
- 29 सप्टेंबर 2022 - 4272
- 28 सप्टेंबर 2022 - 3615
- 27 सप्टेंबर 2022 - 3230
- 26 सप्टेंबर 2022 - 4129
- 25 सप्टेंबर 2022 - 4777
- 24 सप्टेंबर 2022 - 4912
- 23 सप्टेंबर 2022 - 5383
- 22 सप्टेंबर 2022 - 5443
- 21 सप्टेंबर 2022 - 4510
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 3, 2022
➡️ 3,011 New Cases reported in last 24 hours. pic.twitter.com/b3acaMj0Yl
देशातील कोरोना प्रादुर्भावात घट
देशात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात देशात 3011 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 45 लाख 97 हजार 498 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या 36 हजार 126 वर पोहोचली आहे.
मुंबईतही कोरोनाचा आलेख घटला
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवासांपासून चढ-उतार होत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येत आज घट झालीय. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 102 कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 107 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तर एका कोरोना बाधित रूग्णाचा आज मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज मुंबईतील रूग्णसंख्येत घट आहे. काल मुंबईत 130 रूग्णांची नोंद झाली होती. आज 6715 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामधील 102 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)