coronavirus | कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनोखी ट्रंक; 30 मिनिटांत कोणतीही वस्तू विषाणूमुक्त
या पेटीची उपयुक्तता कोविड-19 विषाणू विरूद्धच्या लढ्यात होऊ शकतो. अगदी आपल्या दारात ही पेटी ठेवल्यावर त्याच्या आत ठेवलेला किराणा असो का कॅश असो हे सर्व 30 मिनिटात विषाणुमुक्त होईल, तर अगदी 10 मिनिटात आतील गरम वस्तु बाहेर काढता येतील असे आयआयटीच्या टीम कडून सांगण्यात आले आहे
मुंबई : आय आय टी, रोपर ने करोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी एका पेटीच्या (ट्रंक) आकाराच्या वस्तूची निर्मिती केली आहे. आयआयटी रोपर हे पंजाबमधील रुपनगरमध्ये आहे. या पेटीत अल्ट्रावॉयलेट जर्मिसाईडल रेडिएशन टेक्नॉलॉजीचा (म्हणजे अल्ट्रावॉयलेट किरणयुक्त तंत्राचा वापर करून आतील वस्तु विषाणूरहीत करणे) वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या पेटीची उपयुक्तता कोविड-19 विषाणू विरूद्धच्या लढ्यात होऊ शकतो. अगदी आपल्या दारात ही पेटी ठेवल्यावर त्याच्या आत ठेवलेला किराणा असो का कॅश असो हे सर्व 30 मिनिटात विषाणुमुक्त होईल, तर अगदी 10 मिनिटात आतील गरम वस्तु बाहेर काढता येतील असे आयआयटीच्या टीम कडून सांगण्यात आले आहे. एवढचं नाही तर या पेटीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आली तर ती अगदी 500 रूपये किंमतीमध्ये देखील उपल्ब्ध होईल.
सध्या भारतच काय तर संपूर्ण जग कोविड-19 विषाणूपासून आपल्या बचावाचे मार्ग शोधत आहे. कोविड-19 ची लागण झाल्यास आज जगाकडे या रोगावर औषध नाही. या महामारी पासून बचाव करतांना रूग्णाचे विलगीकरण करणे आणि सामान्यांमध्ये सामाजिक अंतर राखणे ही पाऊलं उचलतांना आपण किती हतबल झालो आहेत हे सर्वांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलंय. आज देशभरात लॉकडाऊन करून तीन आठवडे होत आले आहेत. स्टेज तीनच्या उंबरठ्यावर आपला देश कसोशीने या महामारीपासून देशवासियांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. अशात काही शहरांमधले अनेक भागही आता क्वॉरंटाईन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तुंची गरज पाहता रोज बाहेरुन आणलेला किराणा, भाजीपाला, औषध इत्यादी वस्तूंपासून कोरोनाचा संसर्ग कसा रोखायचा हा सर्व सामान्यांसाठी जिकरीचा प्रश्न झाला आहे. भाजीपाला गरम पाण्यात सोडा टाकून धूवुन घेणे काही प्रमाणात ज्यांना जमतं ते करतातच आहेत. मात्र अशा अनेक वस्तु आहेत ज्यांचे निर्जंतुकीकरण करणे कठीण आहे. अशा वेळी जर आपल्याकडे आयआयटी रोपरने तयार केलेली ही अल्ट्रावॉयलेट किरणयुक्त तंत्राची पेटी उपलब्ध असेल तर अनेक प्रश्न सहज सुटतील. अगदी बाजारहाट करून किंवा इतर कामं करून परत आल्यावर खिशातली कॅश वा वॉलेट, बँक किंवा इतर दस्तावेज, मोबाईल, हातातील घड्याळ, पुस्तकांचे ही निर्जंतुकीकरण सहज होऊ शकेल, असे मत आय आय टी रोपरचे वरिष्ठ विज्ञान आधिकारी नरेश राखा यांनी पीटीआयकडे व्यक्त केले आहे. पाण्याच्या शुद्धिकरणासाठी वापरात येणारं अल्ट्रावॉयलेट रेडिएशन तंत्राचा या पेटीरूपी उपकरणात उपयोग केला आहे. असं असतांना त्या पेटीतला प्रकाश इजा करू शक्तो असे सांगत त्याकडे थेट न बघण्याचा सल्ला प्रा. राखा यांनी दिला आहे. एकिकडे कोविड-19 वर लस शोधण्याचे काम सुरू आहे. तर या जिवघेण्या रोगाची लागण झालेल्या रूग्णांना दुसरीकडे सिम्टोमॅटिक ट्रिटमेंटचा वापर करून त्यांची देखरेख, काळजी घेणं सध्या डॉक्टरांच्या हातात आहे. अशा वेळी या विषाणूची लागण न होऊ देणं ही सर्वात महत्वाची बाब आपण सगळ्यांनी अतिशय गंभीरतेने ध्यानात बाळगायची आहे. Precaution is better than cure!Whats app Group Setting | व्हॉटस्अॅप ग्रुपला ओन्ली अॅडमिनची सेंटिंग करा, मुंबई पोलिसांच्या सूचना