एक्स्प्लोर

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 733 रुग्णांनी जीव गमावला आहे.

Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण काहीसं जास्त आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 733 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 386 वर पोहोचली आहे. 

देशातील कोरोना स्थिती 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 95 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 989 आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 31 हजार 809 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 14 हजार 434 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

दीड वर्षांनंतर राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पहिल्यांदाच 20 हजारांखाली

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 536  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 43  हजार 342  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के आहे. 
 
राज्यात आज 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (0),  धुळे (5), जालना (19), लातूर(54),  परभणी (27), हिंगोली (20), नांदेड (20),  अकोला (21), अमरावती (17),  वाशिम (04),  बुलढाणा (05), नागपूर (78), यवतमाळ (06),  नागपूर (81), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3),  चंद्रपूर (12) गडचिरोली (4 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात सध्या 19 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,72, 600 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 22, 02, 811 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात  420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,31,749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4161 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1373 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Vaccination : मुंबईतील 10 हजार सोसायट्या 'फुल्ली वॅक्सिनेटेड'; महापालिका विशेष लोगो लावणार

महत्त्वाच्या बातम्या

युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
CJP : पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केला, अभिजीत दिपकेंचा आरोप; शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवणार, सीजेपीची भूमिका
पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केला, अभिजीत दिपकेंचा आरोप; शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवणार, सीजेपीची भूमिका
E20 Fuel : पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!
पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget