Coronavirus Cases Today: देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद, 197 मृत्यू
Coronavirus Cases Today: देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज वाढ पाहायला मिळाली आहे.
Coronavirus Cases Today: देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या (Covid19) संख्येत आज वाढ पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 197 मृत्युंची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 651 वर पोहचली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 1 लाख 78 हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, गेल्या 24 तासात 19 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 996 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Corona Update : राज्यात आज 1638 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू
भारत लवकरच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडणार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात काल 41 लाख 36 हजार 142 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील लसीकरणाची एकूण संख्या 99 कोटी 12 लाख 82 हजार 283 डोस देण्यात आले आहेत. भारत लवकरच लसीचा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.
केंद्र सरकारने कोविड लसींची पुरेशी उपलब्धता लक्षात घेता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच पात्र असलेल्या मोठ्या संख्येने लाभार्थींना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देश एक कोटी लसीकरणाचा टप्प्याकडे जात असताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आरोग्य सचिव आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालकांसह देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमेवर चर्चा करून आढावा घेतला.