Coronavirus Cases Today : देशात 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 650 नवे रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 360 वर
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 6 हजार 650 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus Update) प्रादुर्भाव सुरुच आहे. त्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशात शिरकाव केल्यानं चिंता वाढली आहे. दिवसागणिक देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडाही वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 6 हजार 650 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 360 रुग्ण आढळून आले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
ओमायक्रॉनची देशातील स्थिती काय?
- 9 राज्यात ओमायक्रॉनच्या 86 टक्के केसेस
- एकूण ओमायक्रॉनचे रुग्ण 360
- त्यातले 316 रुग्ण केवळ 9 राज्यात
- महाराष्ट्रात सर्वाधिक 88 रुग्ण
- दिल्ली : 67
- तेलंगणा : 38
- तामिळनाडू : 34
- कर्नाटक : 31
- गुजरात : 30
- राजस्थान : 22
- ओदिशा : 4
- उत्तर प्रदेश : 2
आतापर्यंत 4 लाख 79 हजार 133 मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 516 इतकी आहे. या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 79 हजार 133 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) देशात 7 हजार 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 15 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 140 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 140 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (गुरुवारी) 57 लाख 44 हजार 652 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत कोरोना लसीचे 140 कोटी 31 लाख 63 हजार 63 डोस देण्यात आले आहेत.
राज्यात काल (गुरुवारी) 23 नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद
जगभरातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 23 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 7 रुग्ण पिंपरी-चिंचवड, मुंबईत 5 , उस्मानाबादेत दोन रुग्ण, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू शकतात 'हे' निर्बंध
महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. दरम्यान आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यात नेमके काय निर्बंध असतील याबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश
- ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
- Omicron : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ, 23 नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह