(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases India : कोरोना रुग्णांमधील वाढ कायम, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2067 नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी भारतात कोरोनाचे 1247 नवीन रुग्ण आढळले होते.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 13 हजार 248 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 4 लाख 21 हजार 183 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 76 लाख 37 हजार 48 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona : राजधानीत पुन्हा लॉकडाऊन? वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन हायअलर्टवर, दिल्लीत महत्त्वाची बैठक
- Coronavirus : देशात कोरोनाची चौथी लाट? अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढता, केंद्राचं राज्यांना पत्र
- Viral : इथं पुरुष करु शकतात एकापेक्षा अधिक लग्न, केवळ 'या' अटी कराव्या लागणार मान्य
- प्रेयसी नक्की कुणाची? दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha