Coronavirus : सावधान! देशात 15 हजार 940 नवीन कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजारांपार
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती जाणून घ्या.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाच्या संसर्गात सातत्यानं चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या आकडा जरी किंचित घटला असला तरीही देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या देशामध्ये कोरोनाचे 91 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी झालेल्या नवीन 20 मृत्यूंमुळे देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 24 हजार 974 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत 12 हजार 425 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे.
लोकलमध्ये पुन्हा मास्कसक्ती?
राज्य सरकारचा मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीबाबत विविध मुदद्द्यावर चर्चा झाली. कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतं आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 25, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/RMFweCBHRS pic.twitter.com/eHfY7bT9es
मुंबईत शुक्रवारी 1898 नव्या बाधितांची नोंद झाली, तर गुरुवारी 2479 नवे कोरोनाबाधित आढळले होते. 581 कमी नवे बाधित आढळल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
महाराष्ट्रात 4205 कोरोना रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात शुक्रवारी नवीन 4205 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, तर तीन बाधितांचा मृत्यू झालाय. तुलनेनं कोरोना रूग्णसंखेत घट झाली. गुरुवारी राज्यात 5218 रूग्णांची नोंद झाली होती. महाराष्ट्रात शुक्रवारी 3752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 77 लाख 81 हजार 232 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.82 टक्के एवढं झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या