(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासांत देशात 1,150 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 83 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासांत देशात 1 हजार 150 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 365 आहे. देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 656 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76 टक्के असून ते 4 कोटी 30 लाख 34 हजार 217 इतकी वाढली आहे.
सक्रिय कोरोना प्रकरणात 24 तासांमध्ये 147 रुग्णांची घट झाली आहे. कोरोनाचा दैनिक सकारात्मकता दर 0.24 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.23 टक्के आहे. देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. मात्र काही राज्ये अशी आहेत जिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच पाहायला मिळत आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोरोनाचा वाढता पॉझिटिव्ह दर आणि रुग्णांबाबत केरळ, मिझोराम, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा या पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. या पाच राज्यांमध्ये कोरोनाची रुग्ण वाढ कायम आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पाच राज्यांना पत्र लिहून कोरोनाविरुद्धच्या लढाईत चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि निरीक्षण करण्यावर अधिक भर देण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ajit Pawar : पोलीस विभाग कुठेतरी कमी पडला, मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवार
- ST Strike : संपाचा तिढा! एसटी संपात आतापर्यंत काय झालं? जाणून घ्या सविस्तर
- Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट बंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha