(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाचा संसर्गात वाढ, गेल्या 24 तासांत नवीन 1088 कोरोना रुग्णांची नोंद, 26 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 1088 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1088 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाच्या 796 कोरोना रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 870 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 870 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 736 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 5 हजार 410 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.25 टक्के इतका झाला आहे.
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 लाख 05 हजार 335 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 7 लाख 6 हजार 499 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- देशात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर, अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार, तुमच्या शहरांत किमती काय?
- Harbour Line : समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडले! हार्बर रेल्वे काही वेळासाठी विस्कळीत
- Pakistan : नव्या पंतप्रधानांचं बंधूप्रेम, ईदनंतर पाकिस्तानात परतणार नवाज शरीफ, पंतप्रधान शाहबाज शरीफांकडून डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी करण्याचे आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha