Harbour Line : समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडले! हार्बर रेल्वे काही वेळासाठी विस्कळीत
Harbour Line : काही समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. मात्र सकाळपासूनच लोकल सेवा सुरळीत सुरु झाली आहे.

Harbour Line : पनवेल रेल्वे स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे. मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकल सेवा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरळीत मात्र उशीराने सुरु आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट करत या बिघाडाचे कारणही सांगितले आहे. काही समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्टीट करत सांगितलं आहे की, 'काही समाजकंटकानी पनवेल येथील ट्रॅकजवळ सिग्नल यंत्रणा, लोकेशन बॉक्स आणि केबल्सचे नुकसान केले. यामुळे पनवेलजवळील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र सकाळपासूनच लोकल सेवा सुरळीत सुरु झाली आहे.'
Location box having signalling items near track at Panvel km 48/13 and cables have been damaged and by miscreants. Signalling system near Panvel got disturbed and trains were running on paper authority from early morning. Location box 👇 pic.twitter.com/hzDWYhJAw8
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 13, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- देशात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर, अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार, तुमच्या शहरांत किमती काय?
- CNG Price Hike : महागाईचा दुहेरी हल्ला; सीएनजी पाच रुपयांनी तर PNG साडेचार रुपयांनी महागला
- Mumbai Accident : कफ परेड परिसरात बेदरकार चालकाने चौघांना उडवलं, पोलिसाचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
