(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 2.40 लाख नव्या रुग्णांची भर तर 3741 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या नव्या संख्येपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास लाखांनी जास्त आहे. ही बाब दिलासादायक आहे.
नवी दिल्ली : देशातील रोजची कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही दोन लाखांच्या वरच असून गेल्या 24 तासात देशात 2 लाख 40 हजार 842 नव्या कोरना रुग्णांची भर पडली असून 3741 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल एकाच दिवसात 3 लाख 55 हजार 102 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी देशात 2,57,299 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती तर 4,194 लोकांचा मृत्यू झाला होता.
कोरोनासोबतच आता म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 14 राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 65 लाख 30 हजार 132
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 34 लाख 25 हजार 467
- एकूण सक्रिय रुग्ण : 28 लाख 5 हजार 399
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 99 हजार 266
देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के इतकं आहे तर रुग्ण मुक्त होण्याचं प्रमाण 87 टक्के इतकं आहे. जगातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतील भारताचा दुसरा क्रमांक आहे.
राज्यातील स्थिती
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. आज 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 682 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या :