एक्स्प्लोर

Coronavirus Cases : देशात गेल्या 24 तासांत 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 3 आठवड्यांतील सर्वाधिक वाढ

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Cases Today : देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. पाच दिवसांनी 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 43, 654 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 41,678 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनाची सद्यस्थिती 

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 84 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 22 हजार 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 63 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 99 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 

44 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 27 जुलैपर्यंत देशभरात 44 कोटी 61 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 40 लाख 2 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 46 कोटी 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17.36 लाख कोरोनाचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे. 

राज्यात काल (मंगळवारी) 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 58 हजार 751 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के आहे. 

राज्यात काल 254 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 26 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 82 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (53), यवतमाळ (9), गोंदिया (53), गडचिरोली (57), चंद्रपूर (69) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात काल एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 771 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76, 057 (13.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,98,933 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत आज 343 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 343 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 11 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत सघ्या 5267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर आता 1377 दिवसांवर पोहोचला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Delhi Police Lathicharge: दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Saamana Article: '....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
'....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Embed widget