Coronavirus Updates : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला, देशात 1 हजार 829 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 1829 नवीन रुग्ण आढळले असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases in India Today : देशातील कोरोना महामारीच्या संसर्गात सतत चढउतार पाहायला मिळत आहे. एक दिवस आधी नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट आढळल्यानंतर आज पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. देशात 1 हजार 829 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी 1569 नवीन कोरोना रुग्ण आणि 19 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनारुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
देशात 15 हजार 647 सक्रिय रुग्ण
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 647 वर पोहोचली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणामुळे भारताता कोरोनावर मात करण्यात मोठी मदत झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 87 हजार 259 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.75 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
महाराष्ट्रात 266 नव्या रुग्णांची भर
महाराष्ट्रात कोरोनाचे 266 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1551 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 932 सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. पुण्यामध्ये सध्या 299 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8 कोटी 5 लाख 93 हजार 724 रुग्णांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Covid Vaccination : परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या बूस्टर डोसबाबत BMC ची नवी नियमावली, दिले 'हे' निर्देश
- Corona Booster Dose : बूस्टर लसीचा कालावधी 9 महिन्यांवरुन 90 दिवसांवर; आरोग्य मंत्रालयाचा आदेश
- Omicron : ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त, बूस्टर डोसलाही मागे टाकले; अहवालातून स्पष्ट