Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 2 हजार 75 नवीन रुग्ण आढळून आले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
![Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण coronavirus cases in india today 2075 new cases of covid 71 deaths recorded in the last 24 hour Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/66e0371e27f3f3b79df61c252b822667_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये 18 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 हजार 75 नवीन रुग्ण आढळून आले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काल कोरोनाचे 2 हजार 528 रुग्ण आढळले असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या घटून 27 हजार 802 वर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात देशात 4 हजार 722 लोक बरे झाले. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 27 हजार 802 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 352 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 61 हजार 926 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 5 लाख 84 हजार 177 डोस देण्यात आले. आतापर्यंत कोरोना लसीचे 181 कोटी 4 लाख 96 हजार 924 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक (2,16,60,637) लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार
- Coronavirus : चीन आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना
- Deltacron : पुन्हा चिंता वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धडक, 'डेल्टाक्रॉन'ची लक्षणं काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)