(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corornavirus : दिवाळीच्या उत्साहात दिलासादायक बातमी; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, 1994 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाचा आलेखात घट झाली आहे. 11 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा दोन हजारांहून कमी कोरोान रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : दिवाळीच्या उत्साहात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. देशातील कोरोनाचा आलेखात घट झाली आहे. 11 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात 1994 नवे कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या पेक्षा 118 रुग्ण कमी झाले आहेत. काल देशात 2112 रुग्ण आणि सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांसह कोरोनामृतांची संख्याही घटली आहे.
एकूण 4 कोटी 46 लाख 42 हजार 742 जणांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या 1994 नवीन रुग्णांमुळे भारतात आतार्यंतच्या कोविड-19 विषाणूबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 42 हजार 742 वर पोहोचली आहे. यापैकी 4 कोटी 40 लाख 90 हजार 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 28 हजार 961 जणांनी प्राण गमावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतात विक्रमी कोरोना लसीकरण झालं आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.
With 1,994 fresh cases, India's COVID-19 tally climbs to 4,46,42,742; death toll goes up to 5,28,961: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) October 23, 2022
देशात 23 हजार 432 सक्रिय रुग्ण
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे. सध्या देशात 23 हजार 432 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 601 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 961 वर पोहोचली. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 23, 2022
➡️ India’s Cumulative #COVID19 Vaccination Coverage exceeds 219.55 Cr (2,19,55,98,943).
➡️ Over 4.12 Cr 1st dose vaccines administered for age group 12-14 years.https://t.co/GK3pB0X1Uz pic.twitter.com/FBsnGJyTgm