Coronavirus : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, नवीन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या खाली, 19 जणांचा मृत्यू
Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 1569 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील (Coronavirus) कोरोना विषाणूच्या संसर्गात मोठी घट झाली आहे. देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 569 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 2 हजार 467 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांमुळे आता देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 400 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 84 हजार 710 रुग्णांन कोरोनावर मात केली आहे.
देशव्यापी लसीकरणात (Corona Vaccination) आतापर्यंत 191 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीनं आतापर्यंत भारतात 5 लाख 24 हजार 260 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 16 हजार 400 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे.
मुंबईत 74 नव्या रुग्णांची भर
सोमवारी मुंबईत 74 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकाही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. महाराष्टारत आतापर्यंत 77 लाख 31 हजार 588 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या