Corona Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली; सक्रिय रुग्णांची संख्या मात्र पार 96 हजारांपार, 27 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असली तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती जाणून घ्या.

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना देशातील कोरोना रुग्णांमध्ये मात्र किंचित घट पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तर, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. सोमवारी दिवसभरात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती जाणून घ्या.
सक्रिय रुग्णांची संख्या पार 96 हजारांपार
भारतात गेल्या 24 तासात 11,793 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 34 लाख 18 हजार 839 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी सक्रिय रुग्ण 0.21 टक्के आहेत. राष्ट्रीय कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.58 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक 2369 नव्या रुग्णांची नोंद, 1062 रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात सोमवारी 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
दिल्लीत 628 नवीन कोरोनाबाधित, तीन जणांचा मृत्यू
देशाची राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्लीत सोमवारी दिवसभरात 628 नवीन कोरोनाबाधित आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 28, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/hQ6qW64H3W pic.twitter.com/W7gZ7lVf99
महत्त्वाच्या इतर बातम्या























