एक्स्प्लोर
Corona India Update | देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 8 हजार 380 कोरोना रुग्णांची वाढ
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 82 हजार 143 वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 86 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 8 हजार 380 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 143 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 164 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 86 हजार 983 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 4 हजार 613 कोराना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.75 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 89 हजार 995 आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 65 हजार 168 झाला आहे. त्यातील 28 हजार 81 बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 43.09 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 2 हजार 197 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईत 38 हजार 442 कोरोनाबाधित आढळले आहेत त्यातील 1227 जणांचा बळी गेले आहेत. महाराष्ट्रात काल 2 हजार 940 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 1,084 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 99 लोकांचा बळी गेला. राज्यात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 34 हजार 890 आहेत. केरळमध्ये 1208 रुग्ण त्यातील 575 बरे झाले. यातले 9 जण मृत पावले आहेत. केरळचा रिकव्हरी रेट 47.59 टक्के आहे. गेल्या पंधरा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 47 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य तामिळनाडू - एकूण बाधित 21 हजार 184, त्यातले 12 हजार बरे झाले, सध्या रुग्ण 9 हजार 24 , मृतांचा आकडा 160, रिकव्हरी रेट 56.64 टक्के दिल्ली - एकूण बाधित 18 हजार 549, त्यातले 8 हजार 075 बरे झाले, सध्या रुग्ण 10 हजार 58 रुग्ण, मृतांचा आकडा 416, रिकव्हरी रेट 43.53 टक्के गुजरात - एकूण बाधित 16 हजार 343, त्यातले 9 हजार 230 बरे झाले, सध्या रुग्ण 6 हजार 106, मृतांचा आकडा 1007, रिकव्हरी रेट 56.47 टक्के राजस्थान - एकूण बाधित 8 हजार 617, त्यातले 5 हजार 739 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 685, मृतांचा आकडा 193, रिकव्हरी रेट 66.60 टक्के मध्यप्रदेश - एकूण बाधित 7 हजार 891, त्यातले 4 हजार 444 बरे झाले, सध्या रुग्ण 3 हजार 104, मृतांचा आकडा 343, रिकव्हरी रेट 56.31 टक्के उत्तरप्रदेश - एकूण बाधित 7 हजार 445, त्यातले 4 हजार 410 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 834, मृतांचा आकडा 201, रिकव्हरी रेट 59.23 टक्के पश्चिम बंगाल - एकूण बाधित 5 हजार 130, त्यातले 1 हजार 970 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 851, मृतांचा आकडा 309, रिकव्हरी रेट 38.40 टक्के
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























