एक्स्प्लोर

Vaccination : मुलांच्या लसीकरणाला मोठा प्रतिसाद, दोन दिवसांत आठ लाख जणांची नोंदणी

Corona Vaccination For Children : 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोविन (CoWIN) अॅप आणि पोर्टलवर नोंदणी सुरु आहे.

Corona Vaccination For Children : 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोविन (CoWIN) अॅप आणि पोर्टलवर दोन दिवसांपासून नोंदणी सुरु झाली आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.  रविवारी संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 8 लाख मुलांची नोंदणी  करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर प्रसाशनाकडून त्याची पूर्ण करण्यात आली आहे. 

ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुलं लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. 

लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आलंय. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झालं तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे. 

लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल?

  • कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
  • नोंदणीसाठी  https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself  या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
  • लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
  • पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
  • तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
  • तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
    तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकारSharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget