(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Corona Update : देशात कोरोनाचा धोका टळला? 24 तासात केवळ 121 रुग्ण, 'इतक्या' रुग्णांची कोरोनावर मात
Corona Update In India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 121 नवीन रुग्ण आढळून आले, तर एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले
Corona Update In India : भारतात (India) कोरोनाच्या (Corona) स्थितीत चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र सध्याची रुग्णसंख्या पाहता भारतातील कोरोनाचा धोका आता बराच कमी झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 121 नवीन रुग्ण आढळून आले असून, आता कोरोनाचे एकूण रुग्ण 4 कोटी 46 लाख 80 हजार 045 वर पोहोचले आहेत.
एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले. त्यानंतर आता पर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा 220.14 कोटी झाला आहे. सक्रिय रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2319 आहे.
24 तासात 172 रुग्णांची कोरोनावर मात
गेल्या 24 तासात 172 रुग्णांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. सध्या बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के आहे. देशात केवळ 0.01 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. चाचणीही पुन्हा एकदा वाढली आहे. 24 तासांत 1,69,568 चाचण्या केल्यानंतर, आत्तापर्यंत भारतातील एकूण चाचण्यांचा आकडा 91.23 कोटींवर गेला आहे.
सकारात्मकता दरात घसरण (Positivity Rate)
देशात कोरोनाच्या सकारात्मकता दरातही घट नोंदवली गेली आहे. सध्या, भारतातील दैनिक सकारात्मकता दर 0.07 टक्के आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.11 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 91.23 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये गेल्या 24 तासात 1,69,568 चाचण्या करण्यात आल्या. तर, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत एकूण 220.14 कोटी लसीचे डोस (95.14 कोटी लोकांना दुसरा डोस आणि 22.43 कोटी लोकांना बूस्टर डोस) देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 56,829 डोस देण्यात आले.
सोमवारी कोरोनाचे 170 नवीन रुग्ण नोंदवले
सोमवारी (9 जानेवारी) एक दिवस आधी, देशात कोरोनाचे 170 नवीन रुग्ण नोंदवले गेले. 24 तासांत 10 हजारांहून अधिक कोरोनाचे डोस देण्यात आले. आदल्या दिवशी 221 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी आज हा आकडा 170 वर आला आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 4,41,47,174 झाली आहे.
भारतात खबरदारीची पाऊले
जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली असली, तरी भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता भारतात खबरदारीची पाऊले उचलण्यात येत असून देशव्यापी लसीकरण मोहिमेमुळे भारतात 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशात सोमवारी 9 जानेवारी 2023 रोजी 170 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता.
इतर बातम्या
Kolhapur Corona Update : मोठा दिलासा! कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही