Corona : चिंता वाढली; भारतात कोरोनाची वाढली रुग्णसंख्या, दिल्लीतील नोएडामध्ये कलम 144 लागू
Corona : दिल्ली एनसीआरला लागून असलेल्या नोएडा, यूपीमध्ये 31 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Coronavirus : भारतात आता कोरोनाची चिंता वाढू लागली आहे, राजधानी दिल्ली एनसीआरला लागून असलेल्या नोएडा, यूपीमध्ये 31 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान नोएडामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने 31 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे.
का घेतला निर्णय?
गेल्या काही दिवसांपासून यूपीच्या गाझियाबाद आणि नोएडामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नोएडा, गाझियाबाद आणि लखनौसह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मास्क अनिवार्य केले होते. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आता झपाट्याने वाढणाऱ्या केसेस पाहता सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला आहे. नोएडामध्ये 31 मे पर्यंत सरकारने कलम 144 लागू केले आहे. नोएडामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय धरणे व उपोषण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पूजा आणि प्रार्थना करण्यास परवानगी नाही. त्याच वेळी, शाळांमध्ये परीक्षेदरम्यान कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेतली जाईल. मुलांमध्ये सोशल डिस्टंसिंग लागू केले जाईल.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
PM Modi : पंतप्रधान मोदी 2 मेपासून विदेश दौऱ्यावर, तीन देशांना देणार भेट, 25 कार्यक्रमांमध्ये सहभाग
SECR Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज, वाचा सविस्तर
Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम