एक्स्प्लोर

Odisha Train Accident: ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, 50 प्रवाशांचा मृत्यू, 132 जखमी

Train Accident: ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Express) आणि  मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला (Coromondel Express Accident) धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार 132  प्रवासी जखमी झाले असून 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात  एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले. या अपघातात 50 जण ठार झाल्याची माहिती समोर आली असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. 

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

अपघात कशामुळे झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. 

मात्र, अद्याप या अपघाताबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशा पर्यंत धावते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Embed widget