एक्स्प्लोर

सहकारी बँकांच्या हिशेब पुस्तकात अनेक अफरातफरी, प्राप्तीकर अधिकाऱ्यांना संशय

मुंबई : पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सहकारी चळवळीला बसला असा आरोप नोटाबंदीला विरोध असलेल्या सर्वच पक्षांतील राजकीय नेते करत आहेत. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर रिझर्व बँकेनेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सर्व छोट्या मोठ्या सहकारी पतसंस्थांना बंद करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीरकारण्यास मनाई केली होती. त्यामुळे सहकारावर नोटाबंदीने संक्रांत आल्याचा राजकीय नेत्यांचा आरोपही खरा वाटत होता. मात्र आता प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात सहकारी बँका आणि पतसंस्थात नोटाबंदीच्या काळात मोठे घोटाळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी रिझर्व बँकेला पाठवलेल्या अहवालात ही भिती व्यक्त करण्यात आलीय. प्राप्तीकर विभागाच्या तपास पथकाने पहिल्या टप्प्यात जयपूर, राजकोट आणि पुण्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या हिशेबाची पडताळणी केली. त्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. अनेक सहकारी बँकाच्या बुक्समध्ये म्हणजे हिशेब पुस्तकात दाखवण्यात आलेल्या रू. 1000 आणि रू. 500 च्या नोटांमधील रक्कम आणि प्रत्यक्षातील बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात मोठी तफावत आढळून आलीय. प्राप्तीकर अधिकरांच्या तपास पथकाने सध्या फक्त तीनच शहरातील बँकांची तपासणी केली आहे, प्रत्यक्षात जर सर्वच सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या हिशेब पुस्तकांची छाननी केल्यास खूप मोठा घोटाळा उघड होऊ शकतो, असं प्राप्तीकर अधिकाऱ्यांना वाटतं. एका सहकारी बँकेच्या शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवण्यात येत असलेली हजार-पाचशेच्या नोटांमधील रक्कम स्थानिक पोलिसांनी पकडल्यावर जेव्हा प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा ही बाब उघड झाली. बँकेच्या हिशेब पुस्तकात दाखवण्यात आलेली रक्कम आणि प्रत्यक्षातील रोकड यामध्ये तब्बल 100 कोटींपेक्षाही जास्त रक्कमेची तफावत आढळून आलीय. म्हणजे त्या बँकेच्या खातेपुस्तकात हजार पाचशेच्या नोटांमधील रक्कम ही 242 कोटी रूपये असल्याची नोंद होती मात्र प्रत्यक्षात हजार पाचशेच्या नोटांमधील रोकड ही 100 कोटींपेक्षाही कमी भरली होती. प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या या अहवालानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयानेही अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थात रातोरात बचत खाती उघडण्यात आली आणि त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हजार पाचशेच्या रकमा जमा करण्यात आल्या. त्यापैकी बहुसंख्य खात्यांना केवायसी म्हणजे खरोखरच खातं कुणाचं आहे, याचा तपशील देणारी कागदपत्रे जोडलेली नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget