एक्स्प्लोर

शेतकरी आंदोलनात सुपारी किलरद्वारे हिंसेचं षडयंत्र? संशयिताच्या कथित कबुलीनंतर खळबळ

केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 59वा दिवस आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सुपारी देऊन हिंसा घडवली जात असल्याचा खळबळजनक आरोप समोर आलाय. या प्रकरणात एका युवकाला आंदोलनस्थळी पकडून शेतकऱ्यांनीच पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्याची चौकशीही सुरु आहे. पाहूयात काय आहे हा सगळा प्रकार.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी खरंच हिंसेंचं षडयंत्र रचलं जातंय? आंदोलनात हिंसा घडवण्यासाठी सुपारी किलर पाठवले जातायत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. काल आंदोलक शेतकऱ्यांच्या एका नाट्यमय पत्रकार परिषदेनंतर दिल्लीतल्या सिंघु बॉर्डरवर काल आंदोलक शेतकऱ्यांनी एका संशयिताला पकडून माध्यमांसमोर आणलं, आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं. शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही त्यानं दिली. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणानं माध्यमांसमोर केला.

Farmers Protest | चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता; शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या व्यक्तीचा दावा

पोलिसांकडून तरुणाची चौकशी आता या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा शोध पोलीस घेतायत. क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा आहे. जिथं आंदोलन सुरु आहे तिथून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. या तरुणाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय, त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीयत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळालं नसल्याचं सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे.

शेतकरी आणि सरकारमधली चर्चा कालच पुन्हा अनिश्चिततेच्या वळणावर गेली. कारण कालच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी निरोपाचीच भाषा केली. नवी तारीखही ठरलेली नाही. सरकारनं दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिलेला. पण तोही फेटाळला गेला. अशा स्थितीत या नाट्यमय आरोपानं सरकार आणि शेतकऱ्यांमधलं वातावरण पुन्हा गरम बनलं आहे.

कायदा मागे घेतल्याशिवाय माघार नाही ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. शिवाय 26 जानेवारीला दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड करण्यावर शेतकरी ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार हा इशारा त्यांनी दिला आहे. त्यात आता हिंसाचाराचेही आरोप होऊ लागल्यानं पुन्हा तणाव वाढतोय. शेतकरी आंदोलनातला हा सुपारी किलर पाठवण्यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे, हा दावा कितपत खरा आहे हे आता पुढच्या चौकशीतूनच कळेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Embed widget