एक्स्प्लोर

महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी परवाने रद्द; राजीव गांधी फाउंडेशनवरील कारवाईनंतर काँग्रेसची टीका  

RGF and RGCT Licence Cancelled : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) अध्यक्ष असलेल्या 'राजीव गांधी फाउंडेशन' (Rajiv Gandhi Foundation) या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे.

RGF and RGCT Licence Cancelled : केंद्र सरकारने रविवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन एनजीओचे एफसीआरए परवाने रद्द केले.  यावर काँग्रेसने तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रावर निशाणा साधत दिवाळीच्या सुटीत परवाना रद्द करण्यात आल्याचे सांगितले. देशाच्या प्रश्नांपासून  विचलित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. काँग्रेसनेही याला भारत जोडो यात्रेशी संबंधित कारवाई असे म्हटले आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, "संकटात असलेली अर्थव्यवस्था आणि भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशामुळे   पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दिवाळीच्या सुट्टीत लोकांचे लक्ष वळवण्यासाठी राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए सुरू केला आहे.  

आरजीएफ आणि आरजीसीटीच्या कामांची माहिती देताना जयराम रमेश म्हणाले, दोन्ही ट्रस्ट नेहमीच धर्मादाय कार्यात सहभागी आहेत आणि कायद्यांचे पालन करतात. आरजीएफ आणि आरजीसीटी सरकारच्या कारवाईवर कायदेशीरदृष्ट्या योग्य पावले उचलतील.

या संदर्भात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , दिवाळीच्या मुहूर्तावर गांधी घराण्याचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.  राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या गांधी घराण्यातील दोन स्वयंसेवी संस्था होत्या आणि या दोन्हींवर बंदी घालण्याचे काम गृह मंत्रालयाने केले आहे.

"राजीव गांधी फाउंडेशनबाबत सार्वजनिक क्षेत्रात अनेक आरोप झाले होते. 2020 मध्ये जेपी नड्डा यांनी खुलासा केला होता की राजीव गांधी फाउंडेशन, ज्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. त्यांनी चीनकडून तीन वेळा देणग्या घेतल्या होत्या. त्याचबरोबर चीनकडून पैसे घेणाऱ्या एनजीओच्या अध्यक्षपदावर सरकारने अंकुश ठेवला आहे, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 

 "भाजपने राजीव गांधी फाऊंडेशनचा घोटाळा उघड केला आहे. आपत्तीग्रस्तांसाठी असलेल्या पीएम रिलीफ फंडाचे पैसेही राजीव गांधी फाउंडेशनकडे गेल्याचा दावा संबित यांनी केला. इतकेच नाही तर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले त्यांच्याकडून देणग्याही घेण्यात आल्या.  यामध्ये झाकीर नाईक, मेहुल चोक्सी, राणा कपूर यांसारख्या नावांचा समावेश आहे. कायद्यानुसार या प्रकारच्या एनजीओवर कारवाई करणे योग्य आहे, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या

Rajiv Gandhi Foundation: गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका; राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget